शिक्षकांना मोठी संधी..!राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ साठी पायाभूत भाषिक व अंकगणितीय साक्षरता (FLN) व अध्ययन निष्पत्तीवर आधारित नवोपक्रम हाती घेण्यास प्रेरित करणेबाबत...

 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ साठी पायाभूत भाषिक व अंकगणितीय साक्षरता (FLN) व अध्ययन निष्पत्तीवर आधारित नवोपक्रम हाती घेण्यास प्रेरित करणेबाबत...


उपरोक्त विषयान्वये सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी मागील वर्षापासून विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत आहेत. नवोपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा अध्ययन क्षय (Learning loss) भरून काढण्यासाठी नवनवीन उपक्रम हाती घेत आहेत, असे उपक्रम या स्पर्धेसाठी सादर करावेत. याबरोबरच NEP २०२० नुसार या वर्षी राज्यातील विद्यार्थ्याची पायाभूत भाषिक व अंकगणितीय साक्षरता (FLN) करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच या वर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये NAS देखील होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या वर्षी पायाभूत भाषिक व अंकगणितीय साक्षरता (FLN), तसेच इयत्ता व विषय निहाय अध्ययन निष्पत्ती (LOs) तसेच माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता साध्य करण्यावर भर देणारे नवोपक्रम हाती घ्यावेत. ज्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होऊ शकेल. तरी याबाबत शिक्षक व अधिकारी यांना आपल्या स्तरावरून प्रेरित करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ साठी नवोपक्रम सादर करण्याकरिता ऑक्टोवर २०२१ मध्ये

स्वतंत्रपणे लिंक व माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यात येईल.



Post a Comment

0 Comments