खुशखबर, सरकारी कर्मचार्यांना दिवाळी आधी गोड बातमी..!महागाई भत्ता पुन्हा वाढला..! आता ३% महागाई भत्ता वाढला..!dearnessallowanceincreased

खुशखबर, सरकारी कर्मचार्यांना दिवाळी आधी गोड बातमी..!महागाई भत्ता पुन्हा वाढला..! आता ३% महागाई भत्ता वाढला..!dearnessallowanceincreased

▶️पगारात होणार पुन्हा वाढ..!

▶️४८ लाख सरकारी कर्मचार्यांना आणि ५२ लाख पेंशन धारकांना होणार फायदा..!

▶️१ जुलै २०२१ पासून वाढ लागू..! वाचा सविस्तर खाली.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने सरकारी कर्मचार्यांना दिला जाणार महागाई भत्ता १ जानेवारी २०२० पासून गोठविलेला होता.आता राज्यात आणि देशात कोरोनाची स्थिती सुधारली असल्याने आणि सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत सुरु झाल्याने केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने गोठविलेला महागाई भत्ता देण्यास सुरुवात केली आहे.राज्यात राज्य सरकारी कर्मचार्यांना २८% महागाई भत्ता देण्यात येत आहे.हा निर्णय राज्य शासने केंद्र शासनाच्या धरतीवर घेतला आहे.आता आज झालेल्या केंद्रीय मंडळाच्या बैठकी नंतर केंद्रीय अर्थ राज्य मंत्री मा.श्री अनुराग ठाकूर यांनी केंद्रीय कर्मचार्यांना दिवाळी आधी गोड बातमी दिली आहे.केंद्रीय कार्म्चार्यानाचा महागाई भत्ता ३% वाढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.आता केंद्रीय कर्मचार्यांना १ जुलै २०२१ पासून ३१% एवढा महागाई भत्ता दिला अजणार आहे.या निर्णयाचा फायदा जवळपास ४८ लाख केंद्रीय कर्मचारी तसेच ५२ लाख पेंशन धारकांना होणार आहे.

राज्याचे महागाई भत्ता तसेच पगार वाढीचे धोरण केंद्र शासनाच्या निर्णयावर अवलंबून असल्याने नवीन वर्षाच्या सुरुवातील राज्यातील राज्य सरकारी कर्मचार्यांना तसेच पेंशन धारकांना ३१% महागाई भत्ता मिळेल अशी अपेक्षा  राज्य सरकारी कर्मचारी करत आहेत.



 

Post a Comment

0 Comments