राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्यास मुदतवाढ..

 राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्यास मुदतवाढ..

कोरोना संक्रमणाची साखळी खंडीत करण्याकरिता कोव्हीड १९ सार्वत्रिक साथरोगाच्या व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या आकस्मिक सेवांखेरीज, सर्व शासकीय कार्यालये (राज्य, केंद्र, स्थानिक प्राधिकरणाखालील) मर्यादित उपस्थितीसह चालू आहेत. शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मर्यादीत उपस्थितीमुळे संदर्भाधीन क्र. १, २ व ३ अन्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमधील त्रुटींची पूर्तता काही आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडून होऊ शकली नाही. सबब सदर प्रमाणपत्र सादर करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.


संदर्भाधीन क्र.१ येथील परिपत्रकात नमूद प्रमाणपत्र सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी माहे सप्टेंबर २०२१ च्या वेतन देयका सोबत देणे आवश्यक राहील. सदर प्रमाणपत्र वेतन देयकासोबत सादर न केल्यास माहे सप्टेंबर २०२१ ची (देय ऑक्टोबर २०२१) वेतन देयके स्विकारण्यात येणार नाहीत.


सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२१०८०२१५०८१५५१०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



Post a Comment

0 Comments