शासनाचा मोठा निर्णय..! हयातीच्या दाखल्यासाठी निवृत्तीवेतन धारक / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी ५ पर्याय. 5OPTIONSFORLIFECERTIFICATE
शासन परिपत्रक
महाराष्ट्र कोषागार नियम १९६८, नियम क्र. ३३५ अन्वये वर्षातून एकदा निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र कोषागारास सादर करण्याची तरतूद आहे. सर्व निवृत्तीवेतनधारक/ कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांचा हयात असल्याचा दाखला (Life Certificate) दरवर्षी दि. १ नोव्हेंबर रोजी बँकेमार्फत स्विकृत करण्यात येतो. हयातीचा दाखला विहित मुदतीत कोषागार / अधिदान व लेखा कार्यालयास प्राप्त न झाल्यास कोषागार अधिकारी/ अधिदान व लेखा अधिकारी यांचेकडून पुढील निवृत्तीवेतन रोखण्यात येते. निवृत्तीवेतनधारक/ कुटुंबनिवृत्तीवेतनधारक वार्षिक हयातीचे प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करण्याकरीता त्यांना सोयीस्कर ठरेल अशा खालीलपैकी कोणत्याही पर्यायांचा अवलंब करु शकतील.
१. निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेमध्ये प्रत्यक्ष हजर राहून हयातीच्या दाखल्यावर बँक व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करता येईल.
२. राज्य शासनाच्या कोणत्याही राजपत्रित अधिकाऱ्याने सही व शिक्क्यासह साक्षांकीत केलेल हयातीचा दाखला कोषागारास सादर करता येईल.
3. https://jeevanpramaan.gov.in या वेबपोर्टलद्वारे घरबसल्या हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करता येईल. जीवनप्रमाण पोर्टलवर हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्याची कार्यपध्दती You tube माध्यमावर https://youtu.be/nNMIKTYqTF8 लिंक वर उपलब्ध आहे. यादृष्टीने बायोमेट्रीक उसे हस्तगत करण्यासाठी UIDAI यांनी मान्यता दिलेल्या बायोमेट्रिक डिव्हाइसची माहिती www.uidai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
४. भारतीय डाक विभागाने India Post Payment Bank (IPPB) च्या माध्यमातून डिजीटल हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्याची सुविधा सशुल्क उपलब्ध करून दिली आहे. सदर सेवा वापराची विनंती टपाल विभागाकडे स्वतःच्या भ्रमणध्वनीद्वारे करण्यासाठी “Postinfo App" गुगल play store वरुन डाउनलोड करावे. ज्या निवृत्तीवेतनधारकांना / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना भ्रमणध्वनी वापरणे शक्य नाही. त्यांनी नजीकच्या टपाल कार्यालयास भेट दयावी. सदर सुविधा वापराची विनंती टपाल विभागाकडे नोंदविल्यानंतर टपालवाहक आवश्यक साहित्यासह निवृत्तीवेतनधारकाच्या निवासस्थानी येऊन बोटांचे ठसे घेईल. सदरची सुविधा सशुल्क असल्याची नोंद घ्यावी. टपालवाहकामार्फत ऑनलाइन डिजीटल हयातीचा दाखला सादर करण्याची सविस्तर माहिती You tube माध्यमावर https://youtu.be/cERwM U7g54 या लिंकवर उपलब्ध आहे.
५. विदेशात वास्तव्यास असणारे निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतनधारक भारतीय दूतावास (Indian Embassy), भारतीय उच्चआयुक्तालय (High commissionerate of India) अथवा भारतीय वाणिज्य दूतावास (Indian Consulate) येथील प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत हयातीचा दाखला सादर करु शकतील.
निवृत्तीवेतनधारक/ कुटुंबनिवृत्तीवेतनधारक वरीलपैकी कोणत्याही एका पध्दतीने हयातीचा दाखला संबंधित कोषागार कार्यालयास, अधिदान व लेखा कार्यालयास सादर करु शकतात. ऑनलाईन हयातीचा दाखला सादर करण्याच्या संदर्भात अधिक • माहितीकरिता उपरोक्त नमूद संकेतस्थळास भेट दयावी अथवा संबंधित जिल्हा कोषागार/ • अधिदान व लेखा कार्यालयातील निवृत्तीवेतन शाखा येथे संपर्क करावा.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२११२२२१११३४३३५०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
0 Comments