राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी वित्त विभागाची अत्यंत महत्वाची अधिसूचना..!आता १ जानेवारी २०२२ पासून मिळणार केंद्रा प्रमाणे व्याजदर ..! INTERESTRATEONGPF

राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी वित्त विभागाची अत्यंत महत्वाची अधिसूचना..!आता १ जानेवारी २०२२ पासून मिळणार केंद्रा प्रमाणे व्याजदर ..! INTERESTRATEONGPF

वित्त विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० डिसेंबर २०२१.

अधिसूचन

क्रमांक भनिनि २०२१/प्र.क्र.५/सेवा- ६. दरवर्षी केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाकडून सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधीतील जमा रकमांवर व्याज अदा करण्यासाठी व्याजाचे दर अधिसूचनेद्वारे प्रसिध्द केले जातात. केंद्र शासनाने निश्चित केलेला व्याजदर हाच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधोच्या जमा रकमेवर व्याज देण्यासाठी निश्चित केला जातो.

सद्यःस्थितीत भविष्यनिर्वाह निधी व्याज दर हा त्रैमासिक प्रसिद्ध केला जात आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक वेळी वरिष्ठ स्तरावर मान्यता घेऊन व्याज दरास प्रसिद्धी देण्याबाबतच्या प्रक्रीयेत होणारा अपरिहार्य विलंब टाळणे आवश्यक झाले आहे. यासाठी शासन आता असे निर्देश देत आहे की, माहे १ जानेवारी २०२२ पासून केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाकडून भविष्यनिर्वाह निधीच्या जमा रकमेवर व्याज अदा करण्यासाठी वेळोवेळी जे व्याज दर निश्चित केले जातील, तेच व्याज दर राज्य शासकीय कर्मचान्यांच्या भविष्यनिर्वाह निधीच्या जमा रकमेवरील व्याज अदा करण्यासाठी यापुढे लागू राहतील.


Post a Comment

0 Comments