जिल्हानंतर्गत बदली संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण GR।।बदली प्रक्रियेला होणार सुरुवात..
प्रस्तावना:
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी वाचा येथील दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या सन २०२२ मधील बदल्या सदर प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे सदर प्रणाली पूर्णपणे विकसित होण्यास काही विलंब झाला आहे. त्यामुळे सन २०२२ या वर्षीची शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रीया राबवतान्त्र सदर शासन निर्णयात नमूद केलेल्या कार्यवाहीचा काही •कालावधी कमी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सबब, शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:
शासन निर्णय :
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत संदर्भाधीन शासन निर्णयात नमूद केलेली खालील कार्यवाही पूर्ण करण्यासाठी खाली तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे कालावधी विहीत करुन देण्यात येत आहे. सन २०२२ या वर्षीची शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रीया सदर कालमर्यादेत पूर्ण करण्याची खबरदारी घ्यावी. सदर शासन निर्णय फक्त सन २०२२ मधील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांपुरते लागू राहील.
![]() |
0 Comments