महाराष्ट्र शासन वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१४/प्र.क्र.४०/भाग- १/कोषा-प्रशा-४
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक :- १६ जुलै, २०२१.
वाचा : (१) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१४/प्र.क्र.४०/२०१४ कोषा प्रशा-४, दि. ०९.०७.२०१४. (२) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१४/प्र.क्र.४०/२०१४ कोषा प्रशा-४, दि. २५.०६.२०१५. (३) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१४/प्र.क्र.४०/२०१४, कोषा प्रशा-४, दि. २८.०६.२०१६. (४) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१४/प्र.क्र.४०/ भाग - १/२०१४/कोषा प्रशा-४, दि. १७.०७.२०१७ (५) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१४/प्र.क्र.४०/ भाग १ / कोषा प्रशा-४, दि. १६.०७.२०१८ (६) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१४/प्र.क्र.४० / भाग १ / कोषा प्रशा-४, दि. १९.०७.२०१९ (७) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१४/प्र.क्र.४०/ भाग १/ कोषा प्रशा-४, दि. १३.०७.२०२०
प्रस्तावना
उपरोक्त संदर्भ क्रमांक १ ते ७ च्या शासन निर्णयांन्वये कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच दि.३०.०६.२०११ नंतर सेवानिवृत्त झालेले शासकीय अधिकारी/कर्मचारी व कुटूंब निवृत्तीवेतनधारक यांचेकरिता गटविमा तत्वावर आधारित वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना लागू करण्यात आली होती. आता योजनेच्या आढाव्याअंती कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचेकरिता सुरु असलेल्या विमाछत्र योजनेची व्याप्ती वाढविण्याकरिता योजनेत बदल करण्याची व दि.०१.०७.२०२१ ते दि.३०.०६.२०२२ या कालावधीसाठी नुतनीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
प्रस्तुत वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना दि.०१.०७.२०२१ ते दि.३०.०६.२०२२ या कालावधीत सेवानिवृत्त होणारे राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना सक्तीची राहणार नसून स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून संबंधित अधिकारी / कर्मचारी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतील. चालू वर्षापासून या योजनेत नवीन व्यक्तींना सहभागी व्हायचे असेल तर केवळ दि. ३० जून, २०१८ नंतर (योजनेमध्ये समावेशनाची उच्चतम वयोमर्यादा ६१ वर्षे सेवानिवृत्त झालेले अधिकारी/कर्मचारी व शासकीय सेवेतील कार्यरत अधिकारी/कर्मचारी स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरुन या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरतील.
0 Comments