राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये केंद्रीय भरतीपूर्व परीक्षेद्वारे जिल्हानिहाय निवडलेल्या शिक्षण सेवकांना नियुक्ती देण्याबाबत.

विषय :- राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये केंद्रीय भरतीपूर्व परीक्षेद्वारे जिल्हानिहाय निवडलेल्या शिक्षण सेवकांना नियुक्ती देण्याबाबत.



सन २००८-०९ या वर्षापासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील प्राथमिक शिक्षण सेवक पदासाठी भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षा लागू करण्यात आली आहे. त्यानुसार शासन निर्णय दिनांक १६ डिसेंबर, २००९ अन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षण सेवक भरती प्रक्रिया सुधारितरित्या राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक ३१-५-२०११ पर्यत शिक्षण सेवकांच्या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे कडून दिनांक २-५-२०१० रोजी राज्यात एकूण ५९७ परिक्षा केंद्रावर परिक्षा घेण्यात आली. सदर परिक्षेचा निकाल दिनांक १-६-२०१० रोजी लागला असून त्यानुसार १४३१७ उमेदवारांना त्यांच्या पसंती क्रमानुसार घटनात्मक तसेच सामाजिक आरक्षणानुसार त्यांची गुणवत्ता यादी संबंधित आस्थापनाकडे पाठविण्यात आली होती. ज्या आस्थापनाकडे पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी पाठविण्यात आली होती, त्या आस्थापनापैकी काही आस्थापनांनी शिफारस झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली आहे, तर काही आस्थापनांनी अद्यापपर्यंत शिफारस झालेल्या उमेदवारांची मुलाखत व कागदपत्रेसुध्दा तपासली नाहीत.. त्यानुषंगाने शिफारस केलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी शासन पत्र दिनांक ३०-५-२०११ अन्वये दि.३१-८-२०११ पर्यंत भरती प्रक्रियस मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, या कालावधीत सुध्दा काही जिल्हा परिषदांनी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही. या संदर्भात शासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या असून शिफारस झालेल्या उमेदवारांना विहित मुदतीत नियुक्ती देणे क्रमप्राप्त आहे. तद्वतच शिक्षण सेवकांची रिक्त पदे तात्काळ भरणे गरजेचे आहे. यासाठी या भरती प्रक्रियेस दिनांक ३१-१२-२०११ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.


२. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी ज्या आस्थापनाकडे रिक्त जागा आहेत तसेच ज्या उमेदवारांची शिफारस होऊन सुध्दा अशा उमेवारांना नियुक्ती पत्र न दिलेल्याची यादी सादर केलेली आहे. (यादी सोबत जोडली आहे. शिक्षण सेवकांची रिक्त पदे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीकोनातून तातडीने भरणे आवश्यक असल्यामुळे आपल्या आस्थापानावरील रिक्त असलेल्या शिक्षण सेवकांच्या जागा हया शिफारस झालेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेस सामाजिक व घटनात्मक आरक्षणास कोणतीही बाधा न येता नियमानुसार तातडीने भरण्याची कार्यवाही करावी व याबाबतचा अनुपालन अहवाल दिनांक ३१ ऑक्टोबर २०११ पर्यंत शासनास सादर करावा.

Post a Comment

0 Comments