शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवडश्रेणी लागू करणेबाबत सुधारित निकष जाहीर.शिक्षकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी.

विषय: शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवडश्रेणी लागू करणेबाबत सुधारित



तरतूदी. संदर्भ: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचेकडील शासन निर्ण क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.४३/प्रशिक्षण दि. २६.०८.२०१९.


उपरोक्त संदर्भिय शासन निर्णयान्वये शिक्षकांना वरिष्ठ / निवडश्रेणी लागू करण्यासंदर्भातील कार्यपध्दती नमूद करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार शासन निर्णय दि.२३ ऑक्टोबर २०१७ पूर्वी वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी करिता पात्र असलेल्या शिक्षकांची यादी जाहीर करावयाची आहे.


जे शिक्षक वरिष्ठ / निवड श्रेणीकरिता पात्र झाले आहेत. त्यांना याकरिता स्वतंत्र अथवा विशेष प्रशिक्षण पूर्ण करण्याची आवश्यकता नाही.


तरी आपल्या शाळेतील पात्र शिक्षकांची यादी दि. १५.०६.२०२१ पर्यन्त कार्यालयात सादर करावी.


सोबत जोडावयाची कागदपत्रे


शासन निर्णय दि. २३.१०.२०१७ पूर्वी वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीकरिता असलेल्या निकषांप्रमाणे वरिष्ठ व निवड श्रेणीकरिता पात्र असणाऱ्या शिक्षकांची यादी.


२. वैयक्तिक मान्यता


३. मागील दोन वर्षाचे गोपणीय अहवाल समाधानकारक असल्याबाबत मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र.


संस्था ठराव

Post a Comment

0 Comments