राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!Pension/Payment/ Gratuity

 राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!

सप्टेंबर महिन्याच्या वेतन,निवृत्तिवेतन ,उपदान(Gratuity),पेन्शन(pension) करिता अनुदान उपलब्ध..!

वाचा सविस्तर..

सन २०२१- २०२२ या आर्थिक वर्षातील माहे सप्टेंबर, २०२१ या महिन्याचा वेतनवभत्ते, निवृत्तीवेतन, उपदान, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा ७ व्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता या बाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे. अ) ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे. त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही. आ) सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिका-यांने लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा. तसेच खर्चमेळाचा त्रैमासिक अहवाल विहित

प्रपत्रात नियमितपणे सादर करावा. इ) वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना अनुक्रमांक ४ नियम ३९ (ब) टिप-४ अनुक्रंमाक ५ नियम ३९

(ब) टिप ५ तसेच अनुक्रमांक ६ नियम ४० प्रमाणे सक्षम प्राधिका-यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे.






Post a Comment

0 Comments