शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शक सूचना.
शिक्षक व विद्यार्थायांसाठी अत्यंत महत्वपूर्ण सूचना ..!
अखेर राज्यातील शाळा होणार सुरु..!
वाचा खालील सूचना सविस्तर..
उपरोक्त संदर्भाधीन अ.क्र. ८ व १० येथील परिपत्रकान्वये राज्यातील शाळांमधील वर्ग सुरु करणेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. मा. मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनच्या अनुषंगाने शिफारशी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत टास्क फोर्स नियुक्त करण्यात आलेला आहे. सदर टास्क फोर्ससोबत दि. २४.८.२०२१ रोजी झालेल्या चर्चेच्या वेळी टास्क फोर्सने शाळा सुरु करण्यासंदर्भात काही शिफारशी / सूचना केल्या आहेत. सदर सूचनांपैकी ज्या सूचना उपरोक्त अ.क्र. ८ व १० येथील परिपत्रकान्वये विभागाने दिलेल्या नाहीत अशा अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
परिपत्रक :
२. शासन परिपत्रक दिनांक ७ जूलै, २०२१ व दिनांक १० ऑगस्ट, २०२१ नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांसह सदर परिपत्रकात नमूद अतिरिक्त मार्गदर्शक सूचनांचे पालन करून राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग दि. ४ ऑक्टोबर, २०२१ रोजी पासून सुरू करण्यास सदर परिपत्रकान्वये शासन मान्यता देण्यात येत आहे.
0 Comments