निवृत्तिवेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयास पाठविताना निवृत्तिवेतन प्रकरणामध्ये निवृत्तिवेतनधारक/ कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांचा भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक नमूद करणेबाबत.Mobile Number For Pension Case

निवृत्तिवेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयास पाठविताना निवृत्तिवेतन प्रकरणामध्ये निवृत्तिवेतनधारक/ कुटुंब निवृत्तिवेतनधारक याचा भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक नमूद करणेबाबत. Mobile Number For Pension Case


शासन परिपत्रक

निवृत्तिवेतन प्रकरण ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याबाबतच्या सूचना संदर्भाधीन शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. संदर्भाधीन शासन निर्णयासोबतच्या नमुना १ मधील अ.क्र.८ येथे निवृत्तिवेतनधारक / कुटूंब निवृत्तिवेतनधारक यांचा भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक नमूद करावयाचा आहे. तथापि काही सेवानिवृत्ती प्रकरणांमध्ये भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक प्राप्त होत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास/ कुटूंब निवृत्तिवेतनधारकास त्याच्या निवृत्तिवेतन विषयक प्रकरणाची सद्य:स्थिती कळविणे महालेखापाल कार्यालयास शक्य होत नाही.

यास्तव, सर्व कार्यालय प्रमुखांना सूचना देण्यात येत आहेत की, निवृत्तिवेतन / कुटूंब निवृत्तिवेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयाकडे सादर करताना महालेखापाल कार्यालयास निवृत्तिवेतनधारक / कुटूंब निवृत्तिवेतनधारक यांना त्यांच्या निवृत्तिवेतन प्रकरणाची सद्यःस्थिती कळविणे शक्य व्हावे यादृष्टीने निवृत्तिवेतनधारक/ कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांचा भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक त्याच्या निवृत्तिवेतन प्रकरणामध्ये न चुकता नमूद करावा.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२२०१२५१४५६०२०३०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.



Post a Comment

0 Comments