राज्य शासनाचा महत्वाचा GR..!निवृत्तिवेतन धारकांना मिळणार मोठा दिलासा..!
शासन परिपत्रक
संदर्भाधीन क्र. १ येथील शासन परिपत्रकान्वये राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दि. ३१ डिसेंबर, २०२१ दाखला सादर करण्यास दि. ३१ डिसेंबर, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोवीड १९ चा प्रादुर्भाव विचारात घेता, केंद्र शासनाने संदर्भाधीन क्र. २ येथील ज्ञापनान्वये हयातीचा दाखला सादर करण्यास दि. २८ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना देखील हयातीचा दाखला सादर करण्याची कालमर्यादा खालीलप्रमाणे सुधारीत करण्यात येत आहे.
(१) सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास दि. २८ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
(२) हे आदेश अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे आणि जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू राहतील.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२२०१२५१२३२१५३२०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
0 Comments