राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळी पूर्वी होणार..!
वाचा सविस्तर पत्रक खाली..
प्रति,
अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव सर्व प्रशासकीय विभाग, मंत्रालय, मुंबई.
विषय : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी वेतन प्रदान होण्याच्या दृष्टीने वेतन देयके वेळीच कोषागारात सादर करणेबाबत
सर / मॅडम,
दिवाळी हा सण दि. ४ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु होत आहे. माहे ऑक्टोबर, २०२१ चे वेतन कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वी प्रदान होणे आवश्यक आहे.
कोषागारात देयकांची तपासणी होऊन वेतनाचे प्रदान कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास २ ते ३ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. सदर बाब विचारात घेता, आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतनाची देयके कोषागारात दि. २८ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. तरच कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वी वेतन प्रदान करणे शक्य होणार आहे.
तरी त्यादृष्टीने आपल्या अधिनस्त सर्व विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांना उपरोक्त नमूद वेळेत अधिनस्त कार्यालयांना निधीचे वितरण तसेच माहे ऑक्टोबर, २०२१ ची वेतन देयके कोषागारात सादर करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात याव्यात.
अपर मुख्य सचिव(ले.व.को.)
1 Comments
Omsairam
ReplyDelete